गणेश विसर्जनादरम्यान मुस्लिम समुदायाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात ईद-ए-मिलाद 'या' दिवशी करणार साजरा
17 सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार व चंद्रदर्शन झाल्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीचा मोठा सण आहे. त्यामुळे पैगंबर जयंतीची मिरवणूक कधी काढायची याबाबत मागील काही दिवसांपासून शहरातील उलेमा मंडळी तसेच पोलीस प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनादरम्यान मुस्लिम समुदायानी मोठा निर्णय घेतला आहे. 16 तारखेला निघणारा जुलूस मुस्लिम समाजाने पुढे ढकलला आहे. 16 सप्टेंबरला निघणारा जुलूस आता 18 सप्टेंबरला निघणार आहे.
महाराष्ट्रात ईद-ए-मिलाद 18 सप्टेंबरला रोजी साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय येथील मुस्लिम बांधवांनी एकमताने घेतलेला आहे. मुस्लिम संस्थांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. खिलाफत हाऊसमधून हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश विसर्जनादरम्यान शांतता राहावी म्हणून मुस्लिम समुदायानी मोठं पाऊल घेतलं आहे.
गेल्या वर्षी सुद्धा गणेश विसर्जनाच्या दिवशीच पैगंबर जयंती (मुस्लिम बांधवांचा सण) दिवस आलेला होता. त्यावेळी सुद्धा येथील मुस्लिम बांधवांनी दुसऱ्या दिवशी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी सुद्धा तोच योग आल्याने मुस्लिम बांधवांनी आपला सण दोन दिवस उशिरा साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनासह सर्वांनीच स्वागत करीत कौतुक केले आहे.